Headlines

गुजरातच्या वडोदरात बस – ट्रकची धडक, 6 ठार:31 जखमी; राजस्थानहून सुरतला जात होती बस; SDRF – NDRF कडून बचावकार्य सुरू




गुजरातच्या वडोदरा येथे कोटांबी स्टेडियमजवळ बुधवारी सकाळी एका स्लीपर बस आणि ट्रकच्या धडकेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 31 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, बालाजी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस राजस्थानमधील बांसवाडा येथून सुरतला जात होती. वडोदरा येथे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. माहिती मिळताच SDRF, NDRF आणि वडोदरा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली, ती दूर करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथक कार्यरत आहे. ही बातमी सतत अपडेट केली जात आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *