![]()
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पैठण तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती यांच्या हस्ते मंगळवारी वेरूळ सभागृहात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ येथे सन २०२५-२६ या वर्षात जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबकल्याण जागृतीसाठी प्रभावी मोहीम राबविण्यात आली. आरोग्य केंद्र प्रशासनाने जास्तीत जास्त महिला कुटुंबकल्याण शिबिरांचे आयोजन केले. यावेळी महिलांना शस्त्रक्रियेचे महत्त्व, त्याचे फायदे पटवून देत मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी ढाकेफळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर वानखेडे, महेंद्र साळवे, मच्छिंद्र गाडेकर, इंदिरा कोकणी, सविता नांदे, संतोष शिरसाठ, समिना शेख, ज्योती लिपाने यांनी परिश्रम घेतले.
Source link
गौरव:ढाकेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा पातळीवर गौरव