Headlines

चांदवडचा समावेश ‘दुष्काळ ट्रिगर-1’मध्ये करा:बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार मदत जाहीर करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी‎



खरीप हंगाम २०२६ मधील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर-१’ यादीत तातडीने समावेश करावा, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील तहसीलसमोर घोषणाबाजी करत तहसीलदार

.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, देवळा व येवला या १० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, चांदवड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानाही या यादीतून वगळण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करताना केवळ एकूण सरासरी पर्जन्यमान विचारात न घेता, पर्जन्याची तूट, पावसाचा खंड, प्रत्यक्ष पीकस्थीती आणि अन्य प्रभावीत करणाऱ्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासनाने चांदवड तालुक्याचा वस्तुनिष्ठ पूरक अहवाल तयार करुन तातडीने शासनाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, संदीप उगले, नीलेश ढगे, प्रभाकर ठाकरे, दीपक शिरसाठ, निखील राऊत, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

शिवसेना शिंदे गटाने केलेल्या मागण्या अशा १) चांदवड तालुक्यातील सर्व महसूल मंडळांतील गावांमध्ये महसूल, कृषी व पंचायत प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून तातडीने प्रत्यक्ष पीक पाहणी करण्यात यावी. २) दुष्काळामुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची शिफारस शासनाकडे करावी. ३) जमीन महसुलात सूट, शैक्षणिक शुल्कमाफी, शेती पंपांच्या बिलात सवलत व कर्जवसुलीस स्थगिती यांसारख्या दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात. ४) तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *