Headlines

चारधाम यात्रेचा संकल्प:मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; बहीण खासदार प्रीतम मुंडे, आई प्रज्ञाही सोबत




मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवार, 12 जून रोजी गुजरातमध्ये श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली. तसेच चारधाम यात्रेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. आईने केला होता संकल्प मंत्री पंकजा मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या औचित्याने आज या भक्तिमय प्रवासादरम्यान श्री. सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे अत्यंत भक्तीभावाने दर्शन आणि अभिषेक करण्याचे भाग्य लाभले. या पवित्र प्रसंगी आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण मा.खा.डॉ.प्रीतमताई मुंडे सोबत होत्या.’ बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात प्रभास पाटण (वेरावळजवळ) येथे वसलेले श्री सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या मंदिराचा इतिहास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. सोमनाथ नाव कसे पडले? हिंदू पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने (सोम) दक्ष प्रजापतीच्या शापामुळे आपले तेज गमावले होते. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी सरस्वती, हिरण्य आणि कपिला या तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन चंद्राला शापमुक्त केले. त्यानंतर चंद्राच्या विनंतीवरून भगवान शिवाने येथे ‘सोमनाथ’ (चंद्राचा स्वामी) म्हणून निवास केला. असे मानले जाते की, इतिहासकाळात पहिले मंदिर स्वतः चंद्रदेवाने सोन्याचे, दुसरे रावणाने चांदीचे, तिसरे श्रीकृष्णाने लाकडाचे आणि चौथे राजा भीमदेवाने दगडाचे बांधले होते. इतिहास: आक्रमणे आणि पुनरुत्थानाचे अमर प्रतीक मंदिर रचना आणि अद्वितीय वैशिष्ट्ये यात्रेकरूंसाठी महत्त्वाची आणि व्यावहारिक माहिती सुरक्षा आणि सतर्कता आवाहन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *