![]()
भरधाव जळगावच्या दिशेने जाणारी बस समोर थांबलेल्या कंटेनरवरील पोकलेनमध्ये शिरल्याने ४५ पैकी १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील मुखपाठ फाट्याजवळ सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. यातील १३ गंभीर जखमींवर अजिंठा ग्रामीण रुग्
.
एसटी बस क्रमांक (एम.एच-०६ बी डब्ल्यू १२३६ ) ही छत्रपती संभाजीनगरहून ४५ प्रवासी घेऊन जळगावकडे जात होती. समोर असलेला ट्रेलर (अवजड) वाहन क्रमांक (एन.एल. ०१ एल ७६१५) हा पोकलेन घेऊन मुखपाठ फाट्याजवळ शुभम पेट्रोल पंपाजवळ महामार्गाचे काम चालू असल्याने एकदम थांबला. तेवढ्यात पाठीमागून भरधाव जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस कंटेनरवरील पोकलेनला पाठीमागून धडकून अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव जवळपास पुलाचे काम वगळता संपूर्ण महामार्गाचे काम झालेले आहे. मात्र, मुखपाठ फाट्यापासून वाघूर नदीच्या पुलापर्यंत ४०० मीटरचा हा रस्ता पाच वर्षांपासून बनलेला नाही. जागेच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केल्याने प्रकरण कोर्टात गेले. बांधकाम विभागाने त्यांचा मोबदला कोर्टाच्या माध्यमातून मिळवून दिला. यात चार वर्षे लागले. एका वर्षापूर्वी अजिंठा गावातील मोटारसायकलवर जाणारा सोफियान याला अज्ञात वाहनाने उडवून दिल्याने एक महिना तो कोमात होता. परत रविवारी एका बसची समोर चालणाऱ्या कारला पाठीमागून धडक दिली. आता सोमवारी कंटेनरमध्ये बस घुसली. हे सर्व अपघात त्या अपूर्ण महामार्गावरील कामामुळे होत आहेत. कधी कधी ब्रेक मारल्यावरही ब्रेक लागत नाहीत. याला आमच्या भाषेमध्ये ब्रेक रोल म्हणतात. ब्रेक रोल होण्याचे कारण गाडी ओव्हर लोड किंवा अन्य काहीही असू शकते. ब्रेक रोलमध्ये ब्रेक स्थिती चांगली असल्यावरही काही कारणाने ब्रेक लागत नाहीत, अशी माहिती असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर हेमंत लाटे यांनी दिली.
अपूर्ण कामामुळे तो स्पॉट बनला अपघात क्षेत्र
बसचा वेग ७० ते ८० च्या दरम्यान होता. बससमोर ट्रेलरला बस पाठीमागून धडकली. भरधाव बसमध्ये आम्ही असलेले ४५ प्रवासी इकडे तिकडे फेकले गेलो. यात काहींचे डोके फुटले, कुणाला पायाला मार लागला तर काहींना विविध ठिकाणी गंभीर इजा झाली. -अमर कोचे (प्रवासी, नागपूर)