![]()
निवडणूक आयोगाच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत 2024 च्या मतदार यादीतील प्रत्येक नावाची 2002 च्या जुन्या रेकॉर्डशी मॅपिंगद्वारे पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत नावात, जन्मतारखेत अथवा पत्त्यात तफावत आढळलेल्या 3 लाख 61 हजार 281 पैकी 3 लाख 61 हजार 111 मतदारांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या नोटिसांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बहुसंख्य मतदारांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहण्याची आवश्यकता नसून त्यांनी ॲपवर किंवा बीएलओकडे कागदपत्र सादर करण्याचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. जिल्ह्यात एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांत असणे किंवा मृत व्यक्तींच्या नावावर बोगस मतदान होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. ज्यांचे नाव 2002 च्या यादीत सापडणार नाही, त्यांना जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जुने रेशनकार्ड यांसारख्या 14 पर्यायी पुराव्यांपैकी एक पुरावा बीएलओंकडे सादर करावा लागेल. दुरुस्तीसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, दुर्दैवाने नाव वगळले गेले तरी नव्याने नोंदणीचा मार्ग खुला आहे. मतदारसंघनिहाय बजावलेली नोटीस
मतदारसंघ नोटिसा
सिल्लोड 21,880
कन्नड 31,625
फुलंब्री 42,212
औ.बाद (मध्य) 60,591
औ.बाद (प.) 62,110
मतदारसंघ नोटिसा
औ.बाद (पूर्व) 50,042
पैठण 33,273
गंगापूर 39,365
वैजापूर 20,013
एकूण3,61,111 मतदार यादीत नाव नसल्यास हे 14 पुरावे आवश्यक
1] 2002 पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी निवडणूक पावती
2] जमीन /मालमत्तेची कागदपत्रे, भाडेकरू असल्याच्या नोंदी
3] नागरिकत्व प्रमाणपत्र
4] कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
5] निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र
6] पासपोर्ट
7] एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे
8] शासनाने दिलेला कोणताही अधिकृत परवाना/ प्रमाणपत्र
9] शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र/ कागदपत्र
10] बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते पासबुक
11] जन्म प्रमाणपत्र
12] बोर्ड,विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र
13] न्यायालयाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे
14] रेशनकार्ड किंवा शासकीय ओळखपत्र.
विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर नाव वगळले तरी घाबरू नका
3.61 लाख नागरिकांना नोटीस दिली, त्यांची नावे वगळणार का?
नाही. ज्यांचे 2002 च्या यादीत नाव नाही किंवा नावात/पत्त्यात बदल आहे, केवळ त्यांनाच पडताळणीसाठी नोटीस आहे. आवश्यक कागदपत्रे दिल्यास नाव कायम राहील. आता बहुतांश प्रकरणांत सुनावणीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. वर्षानुवर्षे एकाच पत्त्यावर राहूनही नाव कसे वगळले जाते?
बीएलओच्या भेटीवेळी ईआर फॉर्म भरून घेतला जातो. घर बंद आढळल्यास किंवा अन्यत्रही नोंद असेल तर रीतसर नोटीस देऊन नाव वगळण्याची प्रक्रिया होते. माझ्या नावात, वयात किंवा पत्त्यात चूक झाली आहे, काय करू?
पुराव्यासह फॉर्म 8 भरून नागरिक चुकांच्या दुरुस्तीसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. भाडेकरूंकडे घरमालकाचे संमतीपत्र नसेल तर रहिवासी पुरावा कोणता द्यावा?
नोंदणीकृत भाडेकरार सर्वोत्तम आहे. तो नसल्यास स्वतःच्या नावावरील गॅस पासबुक, बँकेचे पासबुक किंवा टपालाने आलेले अधिकृत पत्र ग्राह्य धरले जाते. 2024 चे ओळखपत्र असताना 2002 चे जुने पुरावे कशासाठी हवेत?
सध्याचा मतदार हाच 2002 मधील मूळ व्यक्ती आहे का, याची मॅपिंगद्वारे निवडणूक आयोग खात्री करत आहे. 2002 च्या यादीत नाव नसल्यास जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जुने रेशनकार्ड यांसारखे 14 पर्यायी पुरावे चालतील. 22 वर्षांच्या तरुणाने 2002 चा पुरावा कुठून आणायचा?
तरुणांनी स्वतःचा जन्मदाखला किंवा आई -वडील, आजी-आजोबांचे 2002 च्या यादीतील नाव पुरावा म्हणून द्यावे. पत्ता बदलल्यामुळे दुबार ठरवून माझे नाव पूर्णपणे कमी होईल का?
नाही. मतदाराचे नाव सध्या वास्तव्यास असलेल्या एकाच ठिकाणी अचूक ठेवले जाईल आणि केवळ जुन्या ठिकाणचे नाव कमी केले जाईल. अनाथ, विधवा, वृद्धांसाठी पुराव्यांचे काय पर्याय आहेत?
ते स्वतःचे 14 पैकी कोणतेही पुरावे किंवा मृत्यू/विवाह दाखला देऊ शकतात. वृद्धांसाठी मुलांचे/नातवंडांचे शैक्षणिक दाखले (ज्यावर पूर्वजांचे नाव असेल) किंवा जुन्या शासकीय योजनांची कागदपत्रेही चालतील. पुरावे कुठे जमा करायचे?
बीएलओंकडे प्रत्यक्ष द्या, निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करा किंवा प्रशासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अपलोड करा. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही नाव कमी झाले तर काय करावे?
घाबरण्याचे काहीही कारण नाही. फॉर्म 6 भरून पुन्हा नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करता येते.
Source link
3.61 लाख मतदारांना नोटीस:एसआयआरच्या सर्वच सुनावण्यांसाठी आता मतदारांना जाण्याची गरज नाही, बीएलओकडे कागदपत्रे सादर केल्यास सुनावणीची गरज नाही