Headlines

चिंचपूर वि. वि. सोसायटीच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकार पॅनलचा एकतर्फी विजय:सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला; विजयानंतर केला उमेदवारांचा सत्कार‎




सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित चिंचपूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकारी शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गत ३९ वर्षांची (१९८७ ते २०२६) सहकार्याची व सेवेची परंपरा राखत या पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडवला असून, त्यांना खातेही उघडता आले नाही. सिद्धेश्वर पॅनलच्या विजयी उमेदवारांची नावे : ​जंजाळ काशीनाथ गणपत, जंजाळ आबासाहेब नारायण, जंजाळ हरिचंद्र शामराव, खाकरे महादू पांडू, खाकरे विठ्ठल कृष्णा, जंजाळ दादाराव गणपत, जंजाळ सुभाष केशव, जंजाळ विनोद त्रंबक. ​जंजाळ कांताबाई रामदास, जंजाळ मंगलाबाई सुरेश, सोनवणे रामदास बंडू, हिवरे भानुदास विश्वनाथ, पोपळघट त्रिंबक खंडू. या विजयाबद्दल संपूर्ण विजयी पॅनलचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर आणि इद्रिस मुलतानी आदींनी अभिनंदन केले आहे. चिंचपूर सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *