![]()
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरण समूहातील महत्त्वाचे असणारे भावली धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने इगतपुरी आणि घोटी शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी भावली धरण जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा धरण जुलै महिन्यात तुडुंब भरले आहे. यावर्षी पावसाचा जोर चांगला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी राहिल्याने धरण भरण्यास काहीसा अधिक कालावधी लागल्याचे दिसून येत आहे. यंदा धरण भरले जुलै महिन्यात स्थिती : 100 % भरून ओव्हरफ्लो गतवर्षी धरण भरले जून महिन्यात गेल्या २४ तासांतील पाऊस : 103 मिमी यंदाचे एकूण पर्जन्यमान 1303 मिमी एकूण क्षमता : 1434 दल घफू (सुमारे २.५ टीएमसी) {तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, सर्वच जलसाठ्यांत वेगाने वाढ होत आहे. {भावली धरण ओव्हरफ्लो झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, शेतीसाठीही हा जलसाठा लाभदायक ठरणार आहे. {तालुक्यातील मुकणे, भाम, वाकी आणि दारणा या प्रमुख धरणांमधील जलसाठाही झपाट्याने वाढत आहे. सध्याचा पावसाचा जोर कायम राहिल्यास ही धरणेदेखील लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला . {प्रशासनाने नागरिकांना धरण परिसर, नदीपात्र आणि सांडव्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. धरणाची आकडेवारी
Source link
चिंता मिटली:भावली ओव्हरफ्लो; इगतपुरी व घोटी शहराचा पाणीप्रश्न सुटला