![]()
येथील आई मरी देवी मंदिर परिसरात पहाटेच्या शांततेत घरफोडीचा थरार रंगला. घरात चोरी करताना पकडलेल्या चोरट्याने सुटण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. मात्र, सोनवणे बंधूंनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि ग्रामस्थांच्या
.
आई मरी देवी मंदिराजवळ राहणारे गोरख सुरेश सोनवणे आणि त्यांचे बंधू भाऊसाहेब सोनवणे हे कुटुंबासह शेजारी राहतात. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे दोन्ही कुटुंबे नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने गोरख सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सुमारे अर्धा तोळा सोन्याचे दागिने चोरल्यानंतर तो आणखी मुद्देमाल शोधण्यात गुंतला होता. दरम्यान, पहाटे सुमारे चार वाजता गोरख सोनवणे यांना जाग आली. खाली आल्यानंतर घराचा दरवाजा { उर्वरित पान. २
मुख्तार शेख महबूब शेख (रा. चारगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर पाचोरा व जळगाव पोलिसांत घरफोडी व जबरी चोरीचे १८ ते १९ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.