Headlines

छत्रपती संभाजीनगरात भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा:इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या ग्रंथासह ‘श्री शिवछत्रपती भारत भाग्यविधाता’चे प्रकाशन




इतिहासाचे स्मरण हेच सुरक्षित आणि उज्ज्वल वर्तमानाची शाश्वती आहे, हा विचार घेऊन आयुष्यभर तपस्वी वृत्तीने इतिहास संशोधन करणारे दिवंगत इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे (गजाभाऊ) यांचे अमूल्य विचार आता पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत आहेत. साहित्य भारती आणि श्री शिवशंभू विचार मंच, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित “भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण – उत्तरकालीन मुघल आणि औरंगजेब” आणि प्रा. डॉ. केदार महादेवराव फाळके लिखित “श्री शिवछत्रपती भारत भाग्यविधाता” या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक प्रा. डॉ. दिनेश कचकुरे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. केदार महादेवराव फाळके, पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्य संयोजक गोरक्षनाथ आबूज, बीड आणि साहित्य भारतीचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा तपशील दिनांक : मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : आर्वीकर सभागृह, जीवन विकास ग्रंथालय, टिळक नगर, छत्रपती संभाजीनगर इतिहास प्रेमी, अभ्यासक, वाचक आणि शिवप्रेमींनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विजय पोहनेरकर आणि श्री शिवशंभू विचार मंच, छत्रपती संभाजीनगरचे संयोजक धीरज कांबळे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *