![]()
शाळांतील जंक फूडवर नियंत्रणासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील १ हजार ८४७ मुख्याध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अकोला कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत जास्त चरबी, साखर व मीठ, आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले. चिप्स, कँडी, कोल्ड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ यांचा अतिरेक लठ्ठपणा, मधुमेह, एकाग्रतेशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दे. गो. वीर, अन्न सुरक्षा अधिकारी प्र. नि. काळे, र. व्दा. साळवेकर व कि. ह. बोऱ्हाडे उपस्थित होते. येथे जंक फूडवर बंदी शाळेच्या परिसरापासून ५० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचे जंक फूड व एचएफएसएस पदार्थांची विक्री किंवा जाहिरात करण्यास अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार मनाई असल्याचे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले. ‘ईट राइट स्कूल’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या डब्यात ताजी फळे, कडधान्ये आहाराचा समावेश असावा.
Source link
जंक फूडवर नियंत्रणासाठी शिक्षकांनाच धडे, पोषण आहार:आरोग्याबाबत जागृती; 1 हजार 847 मुख्याध्यापकांचा कार्यशाळेत सहभाग