Headlines

जमिनीचे ‘एनए’ करण्यासाठी आता ऑनलाइन प्रणाली सुरू:हेलपाटे वाचणार, महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन




राज्य सरकारने अकृषिक (एनए-नॉन ॲग्रिकल्चरल) जमीन रूपांतरणाची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता जमीन ‘एनए’ करण्याचे शुल्क (प्रीमियम) ऑनलाइन भरता येणार असून, ही सुविधा ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम’शी (बीपीएमएस) जोडण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात या अद्ययावत ‘बीपीएमएस’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे बांधकाम परवानग्या आणि ‘एनए’ शुल्क भरणे आता एकाच छत्राखाली आले आहे. या सुविधेमुळे सरकारी कार्यायलयात एनए प्रक्रियेसाठी वारंवार हेलपाटे मारण्यापासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांत ‘ऑटोडीसीआर’ प्रणालीही होणार अद्ययावत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी सांगितले की, बीपीएमएसप्रमाणेच आता मोठ्या विकास प्रकल्पांच्या मंजुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ऑटो डीसीआर’ प्रणालीतही युद्धपातळीवर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. येत्या १० दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल, ज्यामुळे मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि गतिमान होणार आहे. प्रणालीचे फायदे, शुल्क भरताच सातबाऱ्यावर आपोआप नोंद महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणांनुसार ही नवी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली असून तिचे फायदे खालीलप्रमाणे आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *