Headlines

जयपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक बंदोबस्त:'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनासाठी पोलीस सतर्क




नीट पेपरफुटीविरोधात जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला होता. या घटनेनंतर नागपुरात १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. सोमवारी जयपूरमधील शहीद स्मारकावर आंदोलन सुरू असताना गर्दीतील काही तरुणांनी अभिजित दिपके यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूर पोलिसांनी शहरातील संविधान चौक आणि मुख्य भागांत चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनादरम्यान तणाव निर्माण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात असून, शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजता होणारे हे आंदोलन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शांततापूर्ण मार्गानेच पार पडेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. दर्जेदार शिक्षण आणि पेपरफुटी प्रकरणाविरोधात होणाऱ्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने पण शांततेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रक्षोभक किंवा समाजकंटकांच्या दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी केले जाईल, अशी भूमिका ‘कॉकरोच जनता पार्टी’ने घेतली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *