Headlines

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केऱ्हाळा फाटा येथे रास्ता रोको:छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प‎




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केऱ्हाळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केऱ्हाळा, पळशी, निल्लोड, बोरगाव कासारी व कायगाव परिसरातील समाज बांधवांनी एकत्र येत एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोलमडली होती. वडोदबाजारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, सिल्लोड ग्रामीणचे निरीक्षक रवींद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन क्षीरसागर, बिट जमादार दादाराव पवार, धनराज खाकरे, शिवनाथ दराडे, कैलास द्वारकुंडे, रमेश व्यवहारे व निवृत्ती जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *