Headlines

ओव्हरटेकच्या चढाओढीमध्ये दोन‎दुचाकींचा अपघातात:तरुणाचा मृत्यू‎, खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना, मृत युवक चिखली येथील




खुलताबाद येथे दर्शनासाठी शुक्रवारी रात्री हजारो भाविक येत असताना संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर दोन स्पोर्ट बाइकस्वारांच्या ओव्हरटेकच्या चढाओढीत अपघात झाला. यात एका दुचाकीवरील ताबा सुटल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय अजय ठेंग (१८, रा. शहापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. विजय हा (एमएच २० एचएम ३९९७) बाइकवरून खुलताबादच्या दिशेने येत होता. सोबत आणखी एक स्पोर्ट बाइकस्वार जात असताना दोघांमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची चढाओढ सुरू झाली. यातून हा अपघात घडला. याच दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सध्या भद्रा मारुती दर्शन व उरुसामुळे या मार्गावर भाविकांची वर्दळ आहे. अशा स्थितीत भरधाव गाड्या चालवणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंदोबस्त वाढवून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर गवळी तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *