Headlines

माढ्यात 550 जणांची तपासणी, 250 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार:सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन‎


.

माढा तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनरावजी शिंदे शुगर अँन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५२१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात सौंदणे येथील ६१ वर्षीय संजय गोडसे यांनी १५० वे रक्तदान केले. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिक, कार्यकर्ते तसेच कारखाना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर कैलास मते यांनी सांगितले.

प्रतिनिधी | माढा माढ्यातील नेत्र तपासणी शिबिरात ५५० जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील २५० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माढा तालुका व परिसरातील गरजू नागरिकांसाठी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्याचे उद््घाटन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार धनाजीराव साठे, नेत्रतज्ज्ञ डॉ. एकनाथ शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार विनायकराव पाटील, सभापती पंडितराव देशमुख, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, दादासाहेब साठे, जिल्हा निबंधक मुकुंद पवार आदी उपस्थित होते. या वेळी सहकारमंत्री पाटील म्हणाले, माढा तालुक्यात मोतीबिंदूमुळे कोणाची दृष्टी जाऊ नये व सर्वसामान्य व्यक्तीला तत्काळ उपचार मिळावा या उदात्त हेतूने उभारलेले बबनदादा शिंदे नेत्रालय हे शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे. येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा आहेच. परंतु भविष्यात रेटिना ऑपरेशनची सोयही सुरू करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक अशोक लुणावत यांनी केले. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी ९०० मोफत शस्त्रक्रियांचे लक्ष्य जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे म्हणाले, माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माढेश्वरी बँकेच्या माध्यमातून २००८ पासून मोफत मोतीबिंदू शिबिर सुरू आहे. दरवर्षी ४०० ते ५०० रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असून, गेल्या १५ वर्षांत ७६०० रुग्णांना दृष्टी देण्यात आली आहे. माढा तालुक्यातून मोतीबिंदूचे उच्चाटन दरवर्षी किमान ९०० मोफत शस्त्रक्रिया करणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *