![]()
शहराची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाणीटंचाईची समस्या आता कायमस्वरूपी दूर होण्याच्या टप्प्यात असून, केंद्र शासनाच्या अमृत जल योजनेअंतर्गत १७५ कोटी रुपयांच्या निधीतून या पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. अकलूजसाठी असणाऱ्या
.
अकलूजच्या पाणीपुरवठ्याला अधिक सक्षम करण्यासाठी निरा उजवा कालवा ७७ मैल ते विझोरी साठवण तलावापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीची थेट पाइपलाइन टाकण्यात येत आहे. यापैकी ६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३ किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे कालवा बंद असतानाही विझोरी तलावात थेट पाणी आणणे शक्य होणार आहे.