![]()
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, केवड तसेच पृथ्वीराज चव्हाण कला, वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय, केवड येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणानिमित्त ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत देश भक्तीपर संदेश देणाऱ्या ५०० हून अधिक राख्या सिमेवरील जवानांसाठी पा
.
सीमेवर ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र जागणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या भावनांना राखीच्या धाग्यात गुंफले. विशेष म्हणजे या राख्या बाजारातून विकत न घेता विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि कौशल्यातून हस्तनिर्मित केल्या. प्रत्येक राखी तयार करताना ‘सीमेवर तैनात असलेला सैनिक माझा भाऊ आहे’ ही भावना विद्यार्थिनींच्या मनात होती. हा उपक्रम सरिता चव्हाण व गितांजली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजावी या उद्देशाने राबविण्यात आला. विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेत ५०० हून अधिक आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्या २० विविध ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाठविण्यात आल्या. केवड गावातून तयार झालेला प्रेमाचा संदेश देशाच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे.