Headlines

माऊली कोकाटे ‘क्रांतिसूर्य केसरी’ तब्बल 3 लाखांचा ठरला मानकरी:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त लढती; सिडनाळे ‘संतनाथ केसरी’‎




श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन आखाड्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आपल्या कुस्तीच्या डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली. धनजी भूमकर आखाड्यात पैलवान अमित जगदाळे, संतनाथ केसरी आखाड्यात शुभम सिडनाळे, तर क्रांतीसूर्य कै. आ चंद्रकांत निंबाळकर आखाड्यात पै. माऊली कोकाटे यांनी किताब पटकावला. क्रांतीसूर्य किताबासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करत तब्बल काही काळ प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अखेर चितपट डावावर माऊली कोकाटे यांनी बाजी मारत ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि चांदीची गदा पटकावून क्रांतीसूर्य केसरीचा मान मिळवला. धनजी भूमकर आखाड्यातील किताबासाठी पैलवान सुनील जाधव आणि पैलवान अमित जगदाळे यांच्यात सुमारे अर्धा तास तुल्यबळ लढत झाली. दोन्ही मल्लांनी ताकदीचे डावपेच लावत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. अखेर पाठीचा घीस्सा डावावर अमित जगदाळे विजयी ठरला. त्याने १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावत धनजी भूमकर आखाड्याचा मानकरी होण्याचा मान मिळवला.एका गुणाने शुभम सिडनाळे ठरला ‘संतनाथ केसरी’ संतनाथ केसरी किताबासाठी पैलवान शुभम सिडनाळे आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश कुंकुळे यांच्यात सुमारे अर्धा तास रंगलेली लढत अत्यंत अटीतटीची झाली. अखेर एका गुणाच्या फरकाने शुभम सिडनाळे विजयी ठरला. त्याने संतनाथ केसरी किताबावर नाव कोरले. १० लाखांची बक्षिसे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *