![]()
मागील पंधरा दिवसांपासून किराणा मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. खोबरे, खाद्यतेल, डाळी, गूळ, शेंगदाण्यांबरोबरच ड्रायफ्रूटसह दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर वाढल्याने महिन्
.
सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने ऑगस्ट अखेरपर्यंत दांडी मारली आहे. समाधान कारक एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशा जळून खाक झाले आहेत. त्याचबरोबर वाढत्या खतांच्या किमती बरोबरच वाढत्या जीवनावश्यक किराणा दुकानातील मालांच्या किमतीमुळे सर्वसामान्य व्यक्तीला जगणे मुश्किल झाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर दिला जात नाही. शेतातील कच्च्या मालापासून तयार करून बाजारात आलेल्या जीवनावश्यक वस्तूला गगनाला भिडणारा भाव दिला जातो. परंतु शेतातील कच्च्या मालाला काडी मोलाचा भाव दिला जात आहे. सदर सरकार हे शेतकऱ्यांचे कि व्यापाऱ्यांचे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सशक्त किसान आत्मनिर्बल भारत मागील पंधरा दिवसांत अनेक किराणा वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः खोबरे, खाद्यतेल, गूळ, शेंगदाणेसह डाळींचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. – ओम स्वामी, श्रीफळ किराणा, पदार्थ: मागील दर : सध्याचे दर खाद्य तेल १४० रूपये किलो १७५ रुपये साखर ४६ किलो ५८ रुपये एक नंबर गुळ ५५ रुपये किलो ७० रूपये शेंगदाणे १०५ रुपये किलो ११९ रुपये मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल त्यावेळी दरवाढ होते, मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल तर दरवाढ कमी होतात. ज्यावेळी माल अति असतो आणि दर नसतो अशा प्रसंगी कच्च्या मालावर प्रक्रिया करून माल बनवला की त्याचे दर जास्त राहतात. योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः विक्रीसह प्रक्रिया करून मालाचे मूल्य संवर्धन करायला हवे वेगवेगळे पदार्थ बनवायला हवेत . – हर्षद निगडे, कृषी अधिकारी, मोहोळ बनवण्यासाठी सरकारने फक्त कर्जमाफी देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी त्याचबरोबर कर्जमाफी देण्याची वेळ न येण्यासाठी प्रथम शेतीमालाला योग्य दर देणे आवश्यक आहे. बनवण्यासाठी सरकारने फक्त कर्जमाफी देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी त्याचबरोबर कर्जमाफी देण्याची वेळ न येण्यासाठी प्रथम शेतीमालाला योग्य दर देणे आवश्यक आहे.