![]()
शहर परिसरातील हायवेसह शहरात येणाऱ्या रस्त्यांवरती गेली, अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम मोहोळ पोलिस स्टेशन नॅशनल हायवे व नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरूच असून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण काढल्याने शहरात येणारे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ पोलिस ठाणे व मोहोळ नगरपरिषद प्रशासन यांच्या अतिक्रमण पथकाने गुरुवार दि २७ रोजी मोहोळ शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावरील अतिक्रमण विरोधातील मोहीम पुन्हा तीव्र करण्यात आली. पोस्ट कार्यालया शेजारच्या व पोलिस ठाणे ते आदर्श चौक या रस्त्यावरील टपऱ्या यंत्रसामुग्रीरीच्या साह्याने काढल्या त्यामुळे रस्ते प्रशस्त झाले आहेत. दरम्यान अनेक छोट्या व्यवसायिकांनी स्वत:हून आपल्या टपऱ्या काढल्या. सोलापूर-पुणे महामार्ग याबरोबरच पंढरपूर पालखी महामार्गावरील बस स्थानक व त्याच परिसरातून शहरात जाणारे रस्ते यावरती छोट्या मोठ्या टपऱ्या टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण काढल्याने शहरात येणाऱ्या रस्ते आता मोकळे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. गुरुवारी पासूनच पोलिस निरीक्षक दीपक पाटील, मुख्याधिकारी डॉ योगेश डोके, बांधकाम विभागाचे अधिकारी बागल, नगररचना विभागाचे कुणाल मोरे, पोलिस उपनिरीक्षक कोल्हाळ, गोपनीय विभागाचे गजानन माळी, वाहतूक शाखेचे सिद्धेश्वर बाबर, तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व अतिक्रमणे काढणार असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. मार्किंगप्रमाणे अतिक्रमण कार्यवाही सुरू सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रिसिडेन्सील एरियामध्ये ४० मीटर तर कमर्शियल एरियामध्ये ७५ मीटर पर्यंतचे अतिक्रमण काढण्याचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने नॅशनल हायवे पोलिस प्रशासन व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल हायवेने मार्किंग करून दिल्याप्रमाणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीमध्ये नागरिकांचा व व्यापाऱ्यांचा सकारात्मक सहभाग आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. – दीपक पाटील, पोलिस निरीक्षक, मोहोळ
Source link
मोहोळ शहरामध्ये अतिक्रमण मोहीम:रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत