![]()
प्रतिनिधी | लासूर स्टेशन जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता बाळकृष्ण शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर काशिनाथ डोंगरे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जळगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे शनिवारी नुकतीच पालकांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. ८ वर्गामधून ९ सदस्य निवडून आले. सदरील ९ सदस्यांनी अध्यक्ष म्हणून कविता शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर डोंगरे यांची बिनविरोध निवड केली. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर पवार, शिक्षक सुधाकर तुपे, रामनाथ चापडे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय भालसिंग, मावळते अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, सुनील पेंभरे, नंदू शिंगाडे यांनी पुढाकार घेतला.
Source link
जळगाव शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता शिंदे:तर उपाध्यक्षपदी डोंगरे