![]()
चांदूरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये ‘धामण सराफ’ प्रजातीचा साप आढळला. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक सर्पमित्र भूषण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना घडली. फार्मचे मालक सुयोग ठाकरे यांच्या पायावरून अचानक साप गेल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने सापाने कोणताही दंश न केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र भूषण काळे यांनी तातडीने पोल्ट्री फार्म गाठले. त्यांनी अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याने सापाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडले. रेस्क्यू करण्यात आलेला साप बिनविषारी ‘धामण सराफ’ प्रजातीचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. हा साप शेती तसेच पोल्ट्री परिसरातील उंदरांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असल्याने पर्यावरणासाठी उपयुक्त मानला जातो. सापाला सुरक्षितपणे पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सर्पमित्र भूषण काळे यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून त्यांच्या धाडसाचे आणि जनजागृतीपर कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
Source link
जवळा शहापूर पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळला:सर्पमित्राने ‘धामण सराफ’ सापाला सुरक्षित पकडून सोडले