Headlines

बडनेर श्रीराम मंदिरात हरिपाठाची सहस्त्रावर्तने संपन्न:अधिक मासानिमित्त 114 स्त्री-पुरुषांचा सहभाग, दुर्मिळ योग




बडनेरा येथील श्रीराम मंदिर संस्थानात अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कमला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची सहस्त्रावर्तने पार पडली. या हरिपाठ सहस्त्रावर्तनामध्ये एकूण ११४ स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. व्यासपीठाचे नेतृत्व सोपान गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमात हरिपाठाची एकूण ११ वेळा आवर्तने करण्यात आली, ज्यामुळे एकूण ११८८ वेळा हरिपाठ म्हटला गेला. सहस्त्रावर्तने पूर्ण झाल्यानंतर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या महामंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. त्यानंतर आरती आणि फराळाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. अधिक महिन्यातील एकादशीला शास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते. अशा पवित्र दिवशी वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हरिपाठाची सहस्त्रावर्तने होणे हा एक दुर्मिळ आणि क्वचितच घडणारा योग मानला जातो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर संस्थानचे कार्यकर्ते अनंत जोशी, पवन तायडे, प्रल्हाद कुथे, संजय जोशी, कार्तिक गद्रे, महेश शेंडे, श्याम खानझोडे, प्रभव गोडबोले, चित्रा जोशी, सुनंदा खानझोडे, डॉ. पूर्वा गोडबोले, गौरी राजबिंडे, रोहिणी देशपांडे, रश्मी देशपांडे, विद्या देव, मीना क्षीरसागर, रंजना रहाटगावकर, पावनी गोडबोले, माया महाडिक आणि माधुरी माहोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *