![]()
जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्यानेवाढ होत आहे. मात्र, माजलगाव धरणात केवळ१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारीपाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणात२५ टक्क्यांपर्यंत साठा होईपर्यंत पाणी सोडण्यातयेणार आहे. जालना, परभणी जिल्ह्यात पाऊसकमी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून पाणीसोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेयेत्या २ ते ३ दिवसांत डाव्या कालव्यातून पाणीसोडण्यात येणार आहे. मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झालाआहे.त्यामुळे जायकवाडी हाच मोठा आधारछत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना याजिल्ह्यांसाठी आहे. सध्या खरिपासाठी पाऊस कमीअसल्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा मार्गजायकवाडीमुळे मोकळा झाला आहे. शुक्रवारी पाणी सोडणार बीडमधील अधीक्षकअभियंता पल्लवी काळे यांनी ‘दिव्य मराठी’शीबोलताना सांगितले की, माजलगाव धरणातपाणीसाठा अत्यल्प आहे. सध्या पाण्याची गरजआहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तयारी केलीजात आहे. उजव्या कालव्यातून साधारण ११००क्युसेक पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे.डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार हेक्टर सिंचनहोते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडजिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. जालना,परभणी जिल्ह्यांतून पाणी सोडण्याची मागणीकरण्यात आली आहे. त्यामुळे हे पाणी सोडल्यासकापूस, सोयाबीन, तूर पिकांना खरिपात संरक्षकपाणी पाळी देणे शक्य होणार आहे. त्यामुळेशेतकऱ्यांना दिलासा मिळेल. संभाजीनगर,जालना, बीड या जिल्ह्यांत आतापर्यंत खरिपाच्या१७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्येआतापर्यंत ५७ % पाऊस परभणी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ२०० मिमी पाऊस झाला आहे. ३५०मिमी पाऊस अपेक्षित असतानासरासरीच्या केवळ ५७ टक्के आहे.परभणीत जायकवाडीचे ९७ हजारहेक्टर क्षेत्र आहे. डाव्या कालव्याच्यामाध्यमातून १ लाख ४१ हजार हेक्टरसिंचन होते. कालव्यातून पाणीसोडल्याने विहिरीच्या पातळीत वाढहोण्यासाठी मदत होईल. जलसंपदाविभागाकडून मान्यता देण्यात आलीआहे, अशी माहिती अधीक्षकअभियंता राजेंद्र धोपटकर यांनी दिली. साठा ६५ टक्के, समन्यायीपाणी वाटपाची बैठक रद्द जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा अधिकपाणीसाठा झाला आहे. जायकवाडीत ६५टक्क्यापेक्षा कमी साठा झाल्यास समन्यायीपाणी वाटपासाठी ऊर्ध्व गोदावरीखोऱ्यातील धरणांतून पाणी सोडले जाते.अनेकदा अहिल्यानगर, नाशिक विरुद्धमराठवाडा असा वाद होतो. मात्र,जायकवाडीत ६७ टक्के पाणीसाठाझाल्यामुळे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपतीसंभाजीनगर यांच्यात समन्यायी पाणीवाटपासाठी होणारी बैठक यंदा होणारनसल्याचे जलसंपदा विभागातीलअधिकाऱ्यांनी सांगितले. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातीलधरणे पूर्णपणे भरत आली जायकवाडी प्रकल्पाचे बहुतांशपाणलोट क्षेत्र अहिल्यानगर वनाशिक जिल्ह्यांत आहे. संभाजीनगरजिल्ह्यात मुक्त पाणलोट क्षेत्राचाभाग येतो. त्यात कन्नड, वैजापूर,गंगापूर, छत्रपती संभाजीनगर यातालुक्यांचा भाग आहे. मात्र,प्रकल्पात बहुतांश पाणीअहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांतूनयेते. यंदा गोदावरी खोऱ्यांतील २१धरणांमध्ये सध्या ८६ टक्केजलसाठा आहे.
Source link
जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी पाणी सोडणार:धरणाच्या डाव्या कालव्यातून जालना, परभणीसाठी पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग