Headlines

हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल:भूसंपादन आदेशांवर सह्या; तत्कालीन‎ जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना जामीन नाही‎




बीड भूसंपादन लवाद प्रकरणातील ३१० कोटींच्या बनावट ‎‎आणि मागील तारखेच्या (बॅकडेटेड) आदेशांवर स्वतः ‎‎‎अविनाश पाठक यांच्याच स्वाक्षऱ्या ‎‎‎असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या ‎‎‎अहवालातून स्पष्ट झाले आहे. या‎‎गुन्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा‎‎थेट आणि सक्रिय सहभाग सिद्ध‎‎झाल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च ‎‎‎न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ‎‎‎न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी‎जामीन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पाठक‎यांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला असून, ७‎मेपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाठक यांचा ‎‎कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.‎ अविनाश पाठक यांनी २८ जून २०२४ ते २२ एप्रिल २०२५‎या काळात बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.‎नवे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनाभूपादन शाखेच्या ‎‎पाहणीदरम्यान जावक क्रमांक नसलेले अनेक‎संशयास्पद आदेश आढळले.‎ हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल तपासामध्ये निर्णायक‎ सुरुवातीला अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा गैरवापर झाल्याचा संशय होता.‎मात्र, १२ मार्च २०२६ रोजी प्राप्त हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालात बॅकडेटेड‎आदेशांवर पाठक यांच्याच स्वाक्षऱ्या असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हा‎निष्काळजीपणा नसून सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. हा‎अहवाल निर्णायक ठरला. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश‎पाठक यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने मंजूर केला नाही. त्यामुळे त्यांचा‎कारागृहामधील मुक्काम वाढला आहे.‎ अहवालातून समोर आलेली‎धक्कादायक माहिती‎ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४‎लवाद आदेश बनावट व फेरफार करून‎तयार करण्यात आले.‎
पाठक यांच्या बदलीनंतर कर्मचारी‎संजय हांगे, अविनाश चव्हाण आणि‎कंत्राटी डेटा ऑपरेटर शेख अझर यांनी‎नस्ती (फाइल) काढून मागील तारखेचे‎रेकॉर्ड तयार केले.‎ मूळ ६८ कोटी रुपयांचा मावेजा‎बेकायदेशीरपणे फुगवून ३१० कोटी‎करण्यात आला आणि त्यापैकी ७३‎कोटींचे वाटपही झाले.‎ व्हॉट्सॲप चॅट, कॉल डिटेल्स आणि‎आवक-जावक रजिस्टरमधील‎विसंगतींवरून १९ नोव्हेंबर २०२५ रोजी‎गुन्हा दाखल करण्यात आला.‎ घोटाळ्यातील ७३ कोटी रुपये वसुलीचे आव्हान‎ आयएएस अधिकाऱ्याचा गैरव्यवहारातील सहभाग शासकीय सचोटीवर‎प्रश्न निर्माण करणारा असून, न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे‎भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश गेला आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाने‎दोषारोपपत्र भक्कम होणार असून, बेकायदा वाटप केलेल्या ७३ कोटी‎रुपयांची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असेल. खंडपीठाने अर्ज‎नाकारल्याने पाठक आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *