Headlines

मेळघाटात 15 दिवसांच्या बाळाच्या पोटावर 12 चटके:रेट्याखेडा येथे ‘डम्मा’ नावाचा अघोरी उपचार, वृद्ध महिलेविरुद्ध चिखलदरा पोलिसांत गुन्हा




मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे एका १५ दिवसांच्या बालिकेवर अघोरी उपचार केल्याची घटना समोर आली. पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील ६५ वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने तिच्या पोटावर तप्त विळ्याचे ११ ते १२ चटके दिले. मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचारपद्धतीला ‘डम्मा’ असे म्हटले जाते. पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. आरोपी महिलेने चुलीवर विळा तापवून बालिकेला चटके दिले. या अमानुष प्रकारामुळे चिमुकलीला तीव्र वेदना झाल्याने तिला तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. चिखलदराचे ठाणेदार प्रवीणकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मुलीच्या आईनेच तक्रार दिली. इनसाइड स्टोरी: ‘डम्मा’ची दोन वर्षांतील तिसरी घटना; चटक्यांमुळे वेदना असह्य मेळघाटातील काही भागांत लहान मुलांचे पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित आजारांवर ‘डम्मा’ देण्याची अघोरी उपचारपद्धती आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात या प्रकारामुळे नवजात आणि लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात, तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गेल्या दोन वर्षांत मेळघाटात अशा प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्याने मेळघाटात जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *