![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, शहांच्या आगामी पुणे दौऱ्याला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अमित शहांनी राजीनामा द्यावा: संजय राऊत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गन्सचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या कारवाईवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले असोत किंवा नसोत, या दडपशाहीला थेट गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आणि दोषी आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.” पुणेकरांना शहांना विरोध करण्याचे थेट आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत पुणेकरांना आवाहन केले आहे. अमित शहा जर पुण्यात येत असतील, तर अख्ख्या पुणेकरांनी त्यांना तीव्र विरोध केला पाहिजे,” असे आवाहन राऊत यांनी केले. तसेच, भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “भाजप सध्या देशातील सर्वात जास्त घाबरलेली पार्टी असून, ते आता निश्चितच सत्तेतून बाहेर जाणार आहेत.” विद्यार्थ्यांच्या ताकदीचे कौतुक तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ताकदीचे कौतुक करताना संजय राऊत यांनी ऐतिहासिक दाखला दिला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजही जेव्हा स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा ते याच मुलांच्या वयाचे होते. त्यांनी अगदी लहान वयातच अनेक किल्ले जिंकले आणि बलाढ्य औरंगजेबाच्या विरोधात लढा उभा केला. एका अर्थाने, छत्रपती शिवराय हेसुद्धा त्या काळातील ‘झेन-झी’ होते. असे राऊत म्हणाले. “विद्यार्थ्यांच्या ताकदीमुळेच शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा” आजच्या ‘झेन-झी’ पिढीमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, असा विश्वास व्यक्त करताना राऊत यांनी या पिढीच्या आंदोलनाचे यश अधोरेखित केले. ते म्हणाले की, “याच तरुण विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे प्रखर आंदोलन केले, त्यांच्या याच ताकदीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे.” तरुणाईच्या या शक्तीला सरकारने कमी लेखू नये, असा इशाराच राऊत यांनी दिला. हेही वाचा.. आजचे एक्सप्लेनर:सरकार CJP ला दिलेले वचन मोडतेय का? आतापर्यंत FIR मागे घेतले नाही, आंदोलकांची चौकशी; पुन्हा आंदोलन होईल का? अभिजीत दीपके यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले – ‘अनेक राज्यांमध्ये पोलीस विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. सरकारने विद्यार्थ्यांना धमकावणे आणि ताब्यात घेणे थांबवावे. जर हे असेच सुरू राहिले, तर आम्ही पुन्हा खूप मोठे आंदोलन करू.’ अखेर जंतर-मंतरवरील आंदोलकांसोबत काय घडत आहे, सरकार खरोखरच वचनभंग करत आहे का, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… सविस्तर वाचा
Source link
भाजप घाबरलेली पार्टी, अमित शहांनी राजीनामा द्यावा:विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून संजय राऊत आक्रमक