Headlines

जिथे उद्याेग-राेजगार तिथेच पायाभूत सुविधांचा बट्ट्याबाेळ- आदित्य ठाकरे:आयटी हब असलेल्या हिंजवडी आणि परिसरात वाहतूक काेंडी




केंद्र सरकारला राज्यातून मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या माध्यमातून कर दिला जातो. परंतु त्या तुलनेने महाराष्ट्राला किती परतावा मिळतो, यामधील किती निधी उद्योगांच्या दिर्घकालीन नियोजनासाठी वापरला जातो हा खरा प्रश्न आहे. चाकण, अंबड, लोटे परशुराम एमआयडीसीची पाहणी केली. हिंजवडीला आलो. जिथे उद्योग-रोजगार आहेत तिथेच पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाल्याचा घणाघात उबाठा नेते-युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. तसेच राज्यातील सर्वच शहरात पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आणली आहे. “विकसित भारत’ “डबल इंजिन’, ‘ट्रिपल इंजिन’ एवढी इंजिनची सरकारे आहे, कुठले इंजिन फेल झाले? असा जळजळीत सवालही त्यांनी उपस्थित केला. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, खड्डे, कचरा, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *