![]()
शासनाची कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणास मान्यता नाही. गणपती व नवरात्रोत्सवाचा विचार करून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने हटवावीत. अन्यथा पुढील मोर्चा लोकशाही पद्धतीऐवजी ठोकशाही पद्धतीने काढला जाईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. रविवारी दुपारी नगरपंचायत चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. ऋषिकेश शेटे यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली. अतिक्रमणे हटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, नेवासा ही पुण्यभूमी असून रस्त्यांवरील अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने हटवावीत. मंदिराकडे जाणारा मार्ग कायमस्वरूपी मोकळा ठेवावा. शेटे यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्यांना अटक करून त्यामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. हभप संग्राम भंडारे यांनी सार्वजनिक रस्ते जनतेच्या सोयीसाठी असून त्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे सांगितले. यावेळी आ. विठ्ठलराव लंघे, ऋषिकेश शेटेउपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. मयूर वाखुरे यांनी केले.
Source link
मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटवावी:अन्यथा पुढील मोर्चा ठोकशाही पद्धतीने- आ. जगताप