Headlines

‘कोरडा दुष्काळ’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना घोषित करा:युवा स्वाभिमानचे जिल्हाधिकारी यांना साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎




जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात. अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, भातकुली तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष धीरज केने, तालुका अध्यक्ष अजय घुले, दशरथ येवले, पराग चांगोले, राहुल लोखंडे, कर्मण जोगराणा, प्रीतम घुगरूड, संजय भारसाकळे, अमोल कोरडे, आशिष कावरे, दिवाकर सगणे, देवानंद राठोड, ओमकार मोहोळ, कर्मण जोगराणा, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. किसान सभेचीही मागणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर किसान सभेचे प्रदेश सचिव अशोक सोनारकर व जिल्हा पदाधिकारी प्रा. विजय रोडगे, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे हा मुद्दा रेटला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *