Headlines

मंगरुळ चव्हाळा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन:ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी धोरणाविरुद्ध पुकारला एल्गार‎




तालुक्यातील मंगरूळ चवाळा गावातील युवकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट नितीविरुद्ध भिक मागो आंदोलन केले. कित्येक वर्षांपासून ग्रामसभा होत नसून सर्व निर्णय चार भिंतींच्या आत घेतले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे गावातील तातडीची विकासकामे करण्यासाठी आता गावकऱ्यांकडे भिक मागण्याशिवाय दुसरा उपाय राहिला नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन हाती घेतले, असे त्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी यापूर्वी बीडीओ यांना या बाबत अवगत केले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे नियमित ग्रामसभा झाली पाहिजे. ग्रामसभेमध्ये लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे निरसन करावे. गावाच्या विकासासाठी आवश्यक ते निर्णय घेऊन ठराव संमत करावेत. गावात झालेल्या विकासकामांचे फलक ठिकाण व ठेकेदारांच्या माहितीसह लावावेत. गावाच्या विकासासाठी प्राप्त शासकीय निधी, खर्च झालेला निधी, शिल्लक असलेला निधी, काम पूर्ण न होऊ शकल्याने परत गेलेला निधी, या सर्व व्यवहारांचे फलक लावावेत. पारदर्शक व्यवहार ठेवावा, अशीही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. नजिकच्या कंपन्या व कारखानदारांकडून मिळणारा निधी व कर याचा जाब विचारतानाच जलजीवन मिशनमध्ये झालेल्या संशयास्पद कारभारावरही आंदोलनकर्त्यांनी बोट ठेवले आहे. गावातील सार्वजनिक शौचालय, रस्ते, नाल्या, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, सर्व सोयींनी युक्त गाव सुसज्ज करावे. एक आदर्श ग्रामपंचायत करण्याची मानसिकता तयार करावी, अशी संबंधितांची मागणी आहे. परंतु गावात गेल्या कित्येक वर्षांपासून मिलीभगतपणे आळीपाळीने व संगनमताने राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे ते शक्य नाही. त्यामुळेच या सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायतीच्या निषेधार्थ भिक मागो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सदर मागण्या व ग्रामपंचायतीची आडमुठी भूमिका याबाबत पुन्हा एकदा बीडीओ तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यापूर्वीही असे निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्याप ना ग्रामसभा झाली, ना कुठली मागणी मान्य झाली. त्यामुळे भविष्यात याहून मोठे आंदोलन उभे करणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *