Headlines

उपवर्गीकरणाचा घाट मागे घ्या:अन्यथा हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव, आनंदराज आंबेडकर‎यांचा इशारा‎




अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसुचित जातीमधील ५९ पैकी एका जातीतील काही मोजके जण विरोध करत आहेत. राज्याने घातलेला उपवर्गीकरणाचा घाट मागे न घेतल्यास, हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालणार असल्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिली. जिल्हाभरातील आंबेडकरी समाजासह विविध सामाजिक संघटना, शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी व संविधानप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. यावेळी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, निवृत्ती आरु सर, सिद्धार्थ आढाव, अमित काळे, गौतमी भिंगारदिवे, प्रा. जाधव एल बी, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. नगरसेवक बनसोडे यांनी ६ ऑक्टोबरच्या मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले. आंबेडकर म्हणाले, सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे. याविरोधात आतापर्यंत राज्यभरात २० मोर्चे काढले. ५९ जातींचे म्हणणे आहे की, उपवर्गीकरण नको. कोर्टाच्या जजमेंटनुसार, एखाद्या राज्याला गरज असेल तर करावे असे निर्देश आहेत. पण जबरदस्तीने उपवर्गीकरणाचा घाट घातला जात आहे. राज्यातील सर्व जाती विरोध करतील, डिसेंबरपर्यंत राज्यभरात मोर्चे होतील. हा घाट मागे न घेतल्यास हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घातला जाईल. २०११ च्या जनगणनेचा विचार केला तर एससी सुमारे १८ टक्के असतील, तर २०२७ पर्यंत ही संख्या २० टक्क्यांवर जाईल. त्यामुळे पुढे आरक्षण २० टक्के करण्याची मागणी करू. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत विचारले असता, काही बोलणार नाही, आम्ही सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. देवेंद्र यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ नये सरकार मराठा-कुणबी, धरगर-आदिवासी, मातंग विरुद्ध इतर असे भांडण लावत आहे. पण जेन झी ने केलेल्या आंदोलनात धर्मेंद्र यांनी राजीनामा दिला. इथे देवेंद्र यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ नये, अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. तसेच सरकार आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *