![]()
सज्जन भक्तांचे परिपालन आणि दुष्टांच्या विनाशाकरीता प्रत्येक युगात धर्मरक्षणासाठी वेगवेगळ्या रूपातून भगवंत अवतार धारण करतात, असे निरुपण येथील कीर्तनकार शाहू महाराज माने यांनी केले. ते श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यानिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महारा
.
कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी शाहू महाराज माने यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.
या कीर्तनाला हार्मोनियमची मधुर साथ श्रीमंत पांचाळ, मृदंग साथ पवन जावळे, साथीदार कोंडीराम पांचाळ, शिवाजी रोंगे भाग्यशाला पांचाळ, दिनकर पांचाळ, रवी मुळे, सुनामी पांचाळ, आनंद पांचाळ, आबासाहेब गोडसे यांनी दिली. गोपाळकाल्याला सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर श्री विठ्ठल मंदिर व ज्योतीबा मंडपात दहीहंडी फोडून गोकुळ अष्टमी उत्सवाची सांगता झाली.
विठ्ठल मंदीरात भक्तीभावाने साजरा झाला श्रीकृष्णांचा जन्मोत्सव विठ्ठल मंदीरात रात्री ९ ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली कौसल्या जाजू, निंगूताई हिंडोळे, इंदूमती जंगाले, उर्मिला शिंदे, नलिनी ग्रामोपाध्ये, लक्ष्मी पाटील, विजया सुतार, कल्पना सलबते, रेखा सुरवसे, राणी बिराजदार, आरती काळे, वासंती जाजू, स्वाती पाठक, अक्षय सरदेशमुख, बाळू घाटगे, पिंटू हिंडोळे आदींसह सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व त्यानंतर गुलाल पुष्प वाहुन, पाळणा गीत व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती करुन मोठ्या भक्तीभावाने श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.