Headlines

शासकीय तंत्रनिकेतनच्या डॉ. सिनकर यांना राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वितरण‎



येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा

.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण योगदान, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण अधिक व्यावहारिक, आधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉ. सिनकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार आवश्यक क्षमता विकसित करण्यासाठी डॉ. सिनकर यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले.

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळणे ही शासकीय तंत्रनिकेतनसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला आणि गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाच्या प्रयत्नांना राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे. डॉ. सिनकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमरावती तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. मानकर, संस्थेतील प्राचार्य डॉ. बोराडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *