Headlines

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस:पाणी अन् उपचार नाकारल्याने प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीलाही दिला नकार




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी‎ मनोज जरांगे पाटील यांचे ‎आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती ‎खालावत असतानाही जरांगे‎ पाटील यांनी पाणी, सलाइन ‎तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास‎ नकार दिला आहे. त्यामुळे‎ समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण ‎निर्माण झाले आहे. सरकारच्या ‎शिष्टमंडळाकडून अद्याप संपर्क ‎करण्यात न आल्याने जरांगे ‎समर्थक संतप्त झाले आहेत.‎त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय ‎महामार्गावर वडीगोद्रीजवळील ‎डाव्या कालव्याजवळ पाऊण‎तास रास्ता रोको आंदोलन केले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *