![]()
स्थायी शिक्षकाच्या नोकरीसाठी तालुक्यातील बोरसर येथील शांती सदन शाळेतील शिक्षक दांपत्याचे धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप शिक्षकाने केला. त्यामुळे या संस्थेच्या 18 शाळा पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.संबंधित संस्थेच्या अनुदानित-विनाअनुदानित मिळून जिल्ह्यात 18 शाळा आहेत. तेथील शिक्षक भरतीच्या पद्धतीचा पोलिस तपास करत आहेत. बोरसरप्रमाणेच अन्य शाळांमध्ये धर्मांतर झाले आहे किंवा नाही, याचा तपास सुरु आहे. या साखळीची व्याप्ती जिल्ह्याबाहेर अथवा परराज्यापर्यंत आहे का, हा शोधाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.पोलिसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले.पथकाने शिक्षकाची चौकशी केल्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. मात्र रविवारी उशिरापर्यंत कोणालाही अटक नव्हती. पती-पत्नीच्या नावावरील दोन कागदपत्रांवर 8 सप्टेंबर 2024 अशा तारखा असून, ‘पवित्रदृढीकरण साक्रामेंत’ स्वीकारल्याची नोंद दिसते. त्यावर बिशपचा उल्लेख, शिक्का आणि स्वाक्षऱ्याही आहेत. ही प्रमाणपत्रे कोणी जारी केली, हे तपासात समोर येईल. मुद्रांक शिक्षकाने आणला की संस्थेने? फिर्यादीतील आणखी एकमहत्त्वाचा दुवा म्हणजे स्टॅम्पपेपर. कथित धर्मांतरानंतर स्टॅम्पवर स्वतःच्या हाताने मजकूर लिहून घेतल्याचा आरोप शिक्षकाने केला आहे.हा बॉण्ड कुणाच्या नावाने खरेदी झाला, त्यावरील स्वाक्षऱ्या नेमक्या कुणाच्या आहेत, हे अस्पष्ट आहे. प्रकार 2024 मध्ये,तक्रार दोन वर्षांनी हे प्रकरण 2024 मधील आहे, नोकरी गेल्यानंतर तक्रार झाली. त्यामुळे यादोन वर्षांत नेमके काय घडले, पाचही आरोपींच्या चौकशीनंतर पैशांचा प्रवास,बॉण्डची पार्श्वभूमी आणि आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, याचे धागे समोर येण्याची शक्यता आहे. पुरावे तपासून पुढे कार्यवाही फिर्यादीच्या आरोपांमध्ये किती सत्यता आहे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. अन्य शाळांशी संबंधित आवश्यक बाबी तपासल्या जातील. पुराव्यांनुसार कार्यवाही केली जाईल. प्रदीप भिवसने, एपीआय, वीरगाव ठाणे 18 शाळांतील भरतीचा तपास संस्थेच्या 18 शाळांपैकी किती अनुदानित-विनाअनुदानित, किती मराठी व किती इंग्रजी माध्यमाच्या आहेत, याचा तपशील महत्त्वाचा ठरणार आहे. जुन्या नियुक्त्यांचा माग काढल्यास भरतीत समान ‘पॅटर्न’ होता, हे स्पष्ट होऊ शकते.
Source link
वैजापुरातील शिक्षक धर्मांतरप्रकरणी संस्थेच्या 18 शाळांमध्ये तपास होणार:संस्थेतील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर पोलिसांना संशय, कुणालाही अटक नाही