Headlines

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील 450 प्रस्ताव जप्त:डीडीआर सुरेखा फुपाटे यांच्या पथकाची कारवाई, प्रशासकाच्या नियुक्तीनंतर जप्तीची कारवाई




हिंगोली येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गंभीर आर्थिक अनियमितता, नियबाह्य कर्जवाटप या कारणांमुळे संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा जिल्हा उपनिबंधकाचा आदेश विभागीय सह निबंधक संतोष बिडवई यांनी कायम ठेवला आहे. त्यानंतर बुधवारी ता. १७ जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने पतसंस्थेमध्ये जाऊन ४५० प्रस्ताव तसेच इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हिंगोली येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत संस्थेला सुमारे २ कोटी ८८ लाख ३५ हजार २५५ रुपयांचा तोटा झाला आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जाची मर्यादांकडे दुर्लक्ष करून जादा कर्ज वाटप झाले होते. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात नसल्याचे समोर आले आहे संस्थेच्या मासिक बैठका न घेणे यासह इतर कारणांवर जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. दरम्यान, संचालक मंडळाने विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी संचालक मंडळाचे अपील फेटाळून लावत जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम ठेवला होता. यानंतर प्रशासन अक्षय गुठ्ठे यांनी पतसंस्थेला पत्र देऊन सर्व प्रस्ताव व आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही पतसंस्थेकडून प्रस्ताव देण्यात आले नाही. त्यानंतर आज जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक अक्षय गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, प्रशासक समितीचे सदस्य विजय गिते यांच्या पथकाने आज पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन ४५० प्रस्ताव जप्त केले आहेत. याशिवाय कार्यालयातील संगणक, सीपीयू, सभासदांच्या याद्या व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. कर्जवसुली केली जाणार- अक्षय गुठ्ठे, प्रशासक जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था या पतसंस्थेकडून कर्जदार सभासदांची यादी घेण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या खात्याची तपासणी केली जाणार असून थकबाकीदार सभासदांच्या कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *