Headlines

जिल्हा रुग्णालयात PCOD क्लिनिक सुरू:महिलांना मिळणार तपासणी, समुपदेशन आणि उपचाराचा लाभ




छत्रपती संभाजीनगर: जिल्हा रुग्णालय आणि वैजापूर ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या आरोग्यासाठी पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरीयन डिसीज) क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे महिलांना पीसीओडी संबंधित तपासणी, समुपदेशन आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दर बुधवारी हे क्लिनिक कार्यरत राहील. यामुळे महिलांना वेळेत निदान मिळण्यास आणि योग्य उपचार घेण्यास मोठी मदत होणार आहे. या उद्घाटनावेळी सहाय्यक संचालक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी पीसीओडी सारख्या आजारांचे लवकर निदान व उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या क्लिनिकमुळे महिलांच्या आरोग्य सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनाने महिलांना या क्लिनिकचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लता वेडेकर, शरीरविकृती तज्ज्ञ डॉ. अपर्णा दिकोंडवार, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. किरण चव्हाण, अधिसेविका शुभांगी थोरात यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. मोतीपवळे यांनी पीसीओडीची लक्षणे स्पष्ट केली. यामध्ये अनियमित किंवा नसलेली मासिक पाळी, चेहऱ्यावर, छातीवर किंवा पोटावर अतिरिक्त केस, वजन वाढणे किंवा कमी होणे, तसेच केस गळणे किंवा पातळ होणे यांचा समावेश आहे. हार्मोन्सचे असंतुलन आणि शरीरातील सूज यामुळे हार्मोन्स बिघडतात, असेही त्यांनी नमूद केले. या क्लिनिकमध्ये तज्ज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत, ज्यामुळे महिलांच्या आरोग्याला मोठा फायदा होईल. वैजापूर येथील ग्रामीण रुग्णालयातही या सेवेचा लाभ महिलांना मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *