Headlines

जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुष्काळ; नेत्यांचा मात्र “सहकार’:जिल्हा बँकेची निवडणूक बिनविराेधचे जुने गणित पुन्हा मांडण्याची दिग्गज नेत्यांची तयारी‎



संगमनेरच्या बैठकीत दुष्काळाचा दाखला देत सर्वपक्षीय नेते एकत्र आले, तेव्हा तो निव्वळ योगायोग वाटावा असे चित्र उभे केले गेले. पण नेमकी हीच बैठक, याच वेळी, एका सुरात का झाली हे समजून घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. कारण हा “योगाय

.

१९५७ साली स्थापन झालेल्या या बँकेवर थोरात, विखे, घुले, गडाख या घराण्यांचा दबदबा राहिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाने राजकीय मतभेद बाजूला सारत विखे गटाला एकटे पाडले होते आणि तेव्हाही निवडणुकीच्या मोठ्या भागातील १७ जागा आधीच बिनविरोध निघाल्या होत्या, “निवडणुकीचा हत्ती गेल्यावर केवळ शेपटासाठी साठमारी’ उरली होती. आज पुन्हा तेच चित्र दिसत आहे. फक्त यावेळी सोबतीला दुष्काळाचा भावनिक आधार जोडला गेला आहे.

२०२३ मध्ये प्रथमच भाजपने शिवाजी कर्डिले यांच्या रूपाने बँकेवर ताबा मिळवला. ६६ वर्षांत पहिल्यांदाच. कर्डिले यांच्या निधनानंतर महायुतीतील समीकरण बदलून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) चंद्रशेखर घुले अध्यक्ष झाले. आता संचालक मंडळ बरखास्त होऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असताना, “२१ जागांचा बिनविरोध फॉर्म्युला’ आणि “महायुतीतील सत्तावाटपाचे गणित’ यावर आधीच चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे.

म्हणजे प्रश्न असा उरतो की, दुष्काळ हे कारण खरे असले, तरी बिनविरोधचा हा फॉर्म्युला दुष्काळामुळे जन्माला आलेला आहे, की तो आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सत्तावाटपाच्या परंपरेला यंदा दुष्काळाचे नैतिक अधिष्ठान दिले जाते? सभासद शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारून जे “एकमत” घडवले जाते आहे, त्याचे लाभार्थी अखेर कोण, हे बिनविरोध निकालानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाते, यावरूनच स्पष्ट होईल.

…तर बिनविरोध होणार नाही ^ आपल्या पूर्वजांनी ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली. आता ठेवीदार आणि कर्जदारांचे हित लक्षात घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यासाठी आपापसातील सुंदोपसुंदी बाजूला ठेवून सर्वांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र कोणी आत्मकेंद्री होऊन केवळ स्वतःचा विचार करून राजकारण केले, तर जिल्हा बँक बिनविरोध होणार नाही. – राम शिंदे, सभापती, विधान परिषद.

संगमनेरच्या बैठकीत नेमके काय झाले? संगमनेर येथील बैठकीत बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, सुजय विखे पाटील यांच्यासह आशुतोष काळे, संग्राम जगताप, विवेक कोल्हे असे डझनभर आमदार-माजी मंत्री एकत्र आले, तर मोनिका राजळे आणि माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले ऑनलाइन सहभागी झाले. दुष्काळी परिस्थिती आणि बँकेची राजकारणविरहित परंपरा यांचा दाखला देत निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय जाहीर झाला. मात्र हीच बिनविरोधची परंपरा यापूर्वीही अनेकदा जपली गेल्याचे बैठकीतच नमूद करण्यात आले, यातून स्पर्धा टाळण्यामागे तात्कालिक कारणापेक्षा कायमस्वरूपी प्रथा अधिक ठळक होते. संबंधित वृत्त पान.४



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *