Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:गणेशोत्सवात 17 हजार भक्तांनी वापरली स्टीलची भांडी




पर्यावरणपूरक गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी भंडाऱ्यात वापरण्यासाठी “माय वसुधा विकास संस्थे’ने मोफत स्टीलची ताटं, ग्लास दिले. उत्सव काळात १६,९०० भक्तांनी स्टीलच्या भांड्यांचा वापर केला. भंडाऱ्यात जेवणासाठी स्टीलची भांडी वापरल्याने प्लास्टिकच्या द्रोणसह अन्य साहित्याचा सुमारे १ टन कचरा निर्माण होणे टळले, असा दावा संस्थेने केला आहे. बाप्पांच्या भक्तीला द्या पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला गणेश भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गणेश घाटावरवही पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती मोहिम राबवण्यात आली. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाप्रसाद, भंडारे आणि सार्वजनिक पंगतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक डिस्पोजेबल वस्तूंना आळा घालण्यासाठी माय वसुधा विकास संस्थेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. संस्थेचे संस्थापक डॉ. मनीषा पालीवाल व डॉ. योगेश पालीवाल यांच्या पुढाकाराने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी तब्बल १,१०० स्टीलची भांडी निःशुल्क उपलब्ध करून आली. डॉ. योगेश पालीवाल यांनी “प्लॅस्टिक डिस्पोजेबल मुक्त महाराष्ट्र अभियान’ची माहिती दिली. प्लॅस्टिक डिस्पोजेबलमध्ये गरम अन्न खाल्ल्याने त्यावरील पातळ प्लास्टिकचे आवरण अन्नात मिसळते आणि ते आपल्या पोटात जाते, परिणामी आपण आजारी पडतो, असे समजावून सांगितले. गणेशोत्सवादरम्यान १६,९०० भक्तांनी भंडाऱ्यात स्टीलच्या भांड्यांचा वापर केला. त्यामुळे प्लास्टिकचे ४२हजार द्रोण, ३० हजार ग्लास, १७ हजार ताटांचा वापर न झाल्याने यातून निर्माण होणारा कचरा टळला. जेवणासाठी स्टीलची भांडी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गतवर्षी सुरू करण्यात आला. आतापर्यंत २ लाख १३ हजार लोकांनी या स्टीलच्या भांड्यातून जेवण केले, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *