![]()
राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर आणि सांगली, तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील. पावसाची उघडीप असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणासह गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागांतून माघार घेतली आहे. रविवारी मान्सूनच्या परतीची सीमा स्थिर होती. मात्र, बिहारपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली अंदमान समुद्रातून म्यानमार आणि बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे. तर, मध्य उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू कमकुवत होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील तापमानाची स्थिती गेल्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पावसाचा विचार करता, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना-नवजा परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीत पूरस्थिती महिन्याआधीच ऑक्टोबर हीट: संभाजीनगर@35.80; सप्टेंबरचे 25 वर्षांतील उच्चांकी तापमान, शहरात महिन्याचे 23 दिवस 30 अंशांपार सप्टेंबर महिना संपत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे. सप्टेंबरमधील गेल्या २५ वर्षांतील उच्चांकी तापमानाची रविवारी (२७ सप्टेंबर) शहरात नोंद करण्यात आली आहे. रविवारी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. यापूर्वी २५ सप्टेंबर २००१ रोजी शहरात कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर प्रथमच कमाल तापमान ३५.८ अंश झाले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १० सर्वाधिक कमाल तापमानांमध्ये रविवारचे तापमान पाचव्या स्थानी आहे. सप्टेंबर महिना संपत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे. सप्टेंबरमधील गेल्या २५ वर्षांतील उच्चांकी तापमानाची रविवारी (२७ सप्टेंबर) शहरात नोंद करण्यात आली आहे. रविवारी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. यापूर्वी २५ सप्टेंबर २००१ रोजी शहरात कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर प्रथमच कमाल तापमान ३५.८ अंश झाले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १० सर्वाधिक कमाल तापमानांमध्ये रविवारचे तापमान पाचव्या स्थानी आहे. यंदा शहराकडे पावसाने पाठ फिरवली आहे. बहुतांश दिवस आकाश निरभ्र आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे शहरातील तापमान सातत्याने ३० अंशांपेक्षा जास्त राहिले आहे. शहरात १३ सप्टेंबरपासून पाऊस नाही. सलग २ आठवडे कोरडे गेल्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धात उच्चांकी तापमान अनुभवास आले आहे. दरम्यान, हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील कमाल तापमान येत्या आठवड्यात ३५ अंशांच्या आसपास राहील. त्यामुळे उकाडाही कायम राहण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा ——— ही बातमी पण वाचा.. एमपीच्या अनेक जिल्ह्यांत 72 तासांपासून पाऊस:महाराष्ट्रातील गडचिरोलीत पूर, यूपीच्या 46 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मध्य प्रदेशातून मान्सून निरोप घेण्यापूर्वी जोरदार बरसत आहे. जबलपूर, सागर, शहडोल आणि रीवा विभागांत ७२ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जबलपूरमध्ये रविवारी बरगी धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून शेजारच्या छत्तीसगड राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ५२५ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा जोर ओसरला:मॉन्सून परतीच्या वाटेवर; पुणे, साताऱ्यासह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट