Headlines

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन:पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक, ज्ञानेश कुमारांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी




मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारावर गंभीर आक्षेप घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर आक्रमक आंदोलन पुकारण्यात आले आहे. ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तत्काळ हटवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार निदर्शने सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर सवाल गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम, मतदार याद्यांमधील कथित गोंधळ आणि निवडणूक आयोगाच्या एकतर्फी वाटणाऱ्या भूमिकेवरून विरोधी पक्षांनी सातत्याने रान उठवले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नुकतीच निवडणूक आयोगावर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर, निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात आणि लोकशाहीचे रक्षण व्हावे, यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना केंद्र सरकारने पदावरून दूर करावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने या आंदोलनातून केली आहे. पुण्यातही जोरदार निदर्शने काँग्रेसच्या या राज्यव्यापी आंदोलनाचे तीव्र पडसाद पुण्यातही उमटत आहेत. पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रस्त्यावर उतरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. पुण्यासोबतच मुंबई, नागपूर, अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर निदर्शने केली जात आहेत. या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले जात असून, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. ——— हेही वाचा.. संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक:मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल केली असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *