![]()
मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात आलेल्या बातम्यांवर त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण देशातील राजकीय विरोधक आपली भूमिका मांडू शकतात, परंतु निवडणूक आयोगाच्या कामात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो, कारण ती एक स्वायत्त संस्था आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधकांना अधिक माहिती मागण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुनील तटकरे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्व पक्षांनी एनडीएच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. 2024 ची लोकसभा निवडणूक ही ‘इंडिया’ आघाडी विरुद्ध एनडीए अशीच झाली, परंतु देशातील जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देश चालवण्याची संधी दिली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी असो वा राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया’ आघाडी, हे सर्व पक्ष एनडीएच्या विरोधात आहेत, असे ते म्हणाले. दापोलीतील अणुऊर्जा प्रकल्पावर काय म्हणाले तटकरे? सुनील तटकरे म्हणाले की, दापोली परिसरात अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात सामंजस्य करार झाला असला, तरी कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येऊ नयेत, ही तिथल्या स्थानिकांची आणि शेतकऱ्यांची भावना असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. तिथल्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, स्थानिकांची भूमिका आग्रहीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पर्यटन क्षेत्राचाही विचार करावा पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्राची गरज म्हणून अणुऊर्जेचे महत्त्व असले, तरी कोकण आणि दापोलीला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. येथील पर्यटन क्षेत्रावर आधारित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे एका बाजूला अणुऊर्जा प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला थंड हवेचे ठिकाण म्हणून असलेली दापोलीची ओळख, या दोन्ही बाबींचा गांभीर्याने विचार करून सरकारने आपली भूमिका ठरवावी, असे खासदार म्हणून आपले मत असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. हे ही वृत्त वाचा
दुष्काळामुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलली:रोहित पवार म्हणाले- 10 ऑक्टोबरला ‘मफलरीं’चे खुलासे करणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आयोजित केलेली आजची महत्त्वाची पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलली आहे. देशात सध्या सुरू असलेला निवडणूक आयोगाचा वाद आणि राज्यावर ओढावलेले भीषण दुष्काळी संकट, यामुळे ही पत्रकार परिषद पुढे ढकलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अजितदादांसाठीचा आपला लढा थांबलेला नाही, असे सांगत त्यांनी आता येत्या १० ऑक्टोबरला काही मोठे खुलासे करण्याचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर
Source link