![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आयोजित केलेली आजची महत्त्वाची पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलली आहे. देशात सध्या सुरू असलेला निवडणूक आयोगाचा वाद आणि राज्यावर ओढावलेले भीषण दुष्काळी संकट, यामुळे ही पत्रकार परिषद पुढे ढकलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अजितदादांसाठीचा आपला लढा थांबलेला नाही, असे सांगत त्यांनी आता येत्या १० ऑक्टोबरला काही मोठे खुलासे करण्याचा इशारा दिला आहे. १० ऑक्टोबरला ‘मफलरीं’चे खुलासे रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) अजित पवार यांना उद्देशून एक भावनिक ट्विट केले आहे. “तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव सुना सुना” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच ट्विटमध्ये त्यांनी माहिती दिली आहे की, आता येत्या १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते एक विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काही ‘मफलरीं’चे खळबळजनक खुलासे करणार असल्याचे त्यांनी म्हटल्याने, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहित पवारांची पोस्ट.. दुष्काळावरून सरकारवर निशाणा आजची पत्रकार परिषद पुढे ढकलली असली, तरी रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत राज्य सरकारला धारेवर धरले. “राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची आहे. त्यामुळे तातडीने सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. खत, पोटॅश, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने लागवडीचा खर्च दुपटीने वाढला आहे. मात्र गेल्या १० वर्षांत पिकांना भाव मिळालेला नाही. सोयाबीनला चार हजारांच्या वर भाव मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून ते सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली भरडले जात आहेत. सरकारने त्यांना तातडीने मदत केली पाहिजे,” अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी केली. अपघाताबाबतचे प्रश्न अद्याप कायम या वर्षी २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जाताना अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला आहे. अजित पवार ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीच्या मालकाचे सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध, विमानातील अतिरिक्त इंधन आणि डॅमेज झालेला ब्लॅकबॉक्स यांसारख्या अत्यंत गंभीर बाबींवर रोहित पवार यांनी बोट ठेवले आहे. या अपघाताच्या चौकशीला जाणीवपूर्वक विलंब का होत आहे? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले असून, आता १० तारखेच्या पत्रकार परिषदेत ते नेमका काय गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक: मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल केली असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळामुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलली:रोहित पवार म्हणाले- 10 ऑक्टोबरला ‘मफलरीं’चे खुलासे करणार