Headlines

सावित्रीबाई फुले साधन केंद्राची सभेत उपक्रम:अकलूजमधील महिला उद्योजका, बचत गटांचा गौरव, सावित्रीबाई फुले साधन केंद्राची सभेत उपक्रम‎




महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान व तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र, यशवंतनगर यांच्या १७ व्या वार्षिक सभेत महिला उद्योजक व बचत गटांचा गौरव करण्यात आला. सीएमआरसीच्या अध्यक्षा जयश्री एकतपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेचे उद्घाटन माविमचे विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे यांच्या हस्ते झाले. या वेळी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी दीपक टेकाळे, तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक महेश गव्हाणे, युनियन बँकेचे किशोर धुके उपस्थित होते. सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, आर्थिक लेखाजोखा आणि आगामी नियोजन सादर करण्यात आले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक व्यवहारांत सक्रिय सहभाग घ्यावा, उद्योगवाढीसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत बँकेमार्फत सुमारे १२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाल्याची माहिती महेश गव्हाणे यांनी दिली. या वेळी उत्कृष्ट महिला उद्योजिका, बचत गट, परसबाग आणि कार्यतत्पर पदाधिकाऱ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ९ लाखांची उलाढाल, पासगेंचा सन्मान रुक्मिणी पासगे यांना शेळीपालन व्यवसायासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यांनी २०१६ मध्ये १० हजार रुपयांच्या कर्जातून दोन शेळ्या घेऊन व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे १७ शेळ्या व १५ बोकड असून, व्यवसायातून सुमारे नऊ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. प्रोत्साहनपर त्यांचा सन्मान करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *