![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवास आजपासून श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये मोठ्या जल्लोषात प्रारंभ होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील एकूण २००० कलावंत विद्यार्थ्यांचा ३९ कलाप्रकारांतून सहभाग राह
.
महोत्सवाचे उद््घाटन सकाळी दहा वाजता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर असतील. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष बी. वाय, यादव, सचिव नंदन जगदाळे यांच्यासह, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी उद््घाटन समारंभानंतर एकूण सहा कलामंचावर सादरीकरणास प्रारंभ होणार आहे. दि. २८ पासून सुरू झालेल्या युवा महोत्सवाचा समारोप १ ऑक्टोबर रोजी सकाळी होणार आहे. अभिनेत्री श्रेया बुगडे ही समारोपाला येणार आहे.
उद््घाटनानंतर दुपारच्या सत्रापासून सादरीकरण होणार आहे. विविध स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी लावणी, समूहगायन, कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा लेखी, वक्तृत्व, भारूड, भित्तीचित्रण, काव्यवाचन,कला प्रकार सांगणार.
{सकाळी 8 ते 10- नोंदणी {सकाळी 10 ते दुपारी 12- उद्घाटन समारंभ {दुपारी 12.15 ते 12.45- संघ व्यवस्थापक बैठक {दुपारी 1 ते सायं. 4- लावणी {दुपारी 1 ते रात्री 10- समूहगायन {दुपारी 1 ते दु. 3.30- कातरकाम {दुपारी 1 ते सायं. 4-मूक अभिनय {दुपारी 1 ते दु. 2-प्रश्नमंजुषा लेखी {दुपारी 2 ते दु. 5-वक्तृत्व मराठी {दुपारी 4 ते सायं. 7-भारुड {दुपारी 4 ते 6.30-भित्तीचित्रण {सायंकाळी 5 ते रा. 10 काव्यवाचन {सायंकाळी : 6 ते रा. 10-एकांकिका {सायंकाळी 7 ते रा. 9.30-मेंदी {सायंकाळी 7 ते 10-भजन.