![]()
सिल्लोड तालुक्यात माणिक महाराज शेळके यांच्या प्रेरणेतून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या गावोगावी एकदिवसीय कीर्तन फिरती पौर्णिमा उपक्रमांतर्गत भवन येथे मंगळवारी ४० व्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
.
यावेळी संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ विवेचनातील अभंग क्रमांक २२ पिंडी देहस्थी ब्रह्मांडीं पसारा, हरिविण सारा व्यर्थ भ्रम या अभंगाची निवड करण्यात आली होती. संदीप महाराज काकडे यांनी या अभंगाच्या अनुषंगाने कीर्तनातून मानवी देहाची रचना तसेच हरी आणि पांडुरंगाचे महत्त्व याविषयी सविस्तर विवेचन केले. यावेळी ते म्हणाले की, मृत्यूलोकात खरे सुख नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वार्थाचा विचार करीत आहे. मानवी जीवन व्यर्थ न घालवता हरीचे नामचिंतन करावे आणि ते आपल्या दैनंदिन आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी भाविकांना केले.