Headlines

जेवणातून औषधे दिल्याच्या संशयातून मुलाने‎बॅटने आईची हत्या करत स्वत:लाही संपवले‎:आईवर हल्ला केल्यानंतर मुलाची दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या‎, नांदेडची घटना



तरुणाने बॅटने वार करुन आईची हत्या केली.‎त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या‎केली. ही घटना नांदेड शहरातील तरोडा‎भागातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री‎उशिरा घडली. प्रतीक चौथरे (२४) आणि‎भारती चौथरे (५२) अशी दोघा मृतांची नावे‎आहेत. प्रतीकवर मानसोपचार तज्ज्

.

राहुल कॉलनी येथील बालाजी सोपान‎चौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथे‎कर्तव्य बजावतात. त्यांची मुलगी प्राची पुणे‎येथे शिकते, तर पत्नी भारती आणि मुलगा‎प्रतीक हे दोघेच नांदेड येथे होते. प्रतीकची‎मानसिक स्थिती खालावत असल्याने‎आई-वडिलांनी त्याला नांदेडच्या एका‎मनोविकार तज्ज्ञाकडे दाखवले होते.‎

९ ऑगस्टला सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचे दार बंद‎होते. त्यामुळे नातेवाईकांनी प्रतीकच्या मामाला फोन‎करून माहिती कळवली. प्रतीकचे मामा तातडीने‎घटनास्थळी आले. त्यावेळी इतरांच्या मदतीने त्यांनी‎घराचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना रक्ताच्या‎थारोळ्यात पडलेली बहीण दिसली. त्यानंतर भाचा‎प्रतीकचा शोध घेतल्यावर दुसऱ्या खोलीत त्याने गळफास‎घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती भाग्यनगर‎पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह‎शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठवले.‎

संशयामुळे प्रतीक आईसोबत‎नेहमी वाद घालत असे. एवढेच‎नव्हे तर तो घरी आईने बनवलेले‎जेवण न करता ऑनलाइन‎खाद्यपदार्थ मागवत होता.‎आई-वडील आपली वैयक्तिक‎माहिती लिक करत असल्याचा‎राग त्याच्या मनात वाढत होता.‎

८ दिवसांत रेल्वे सेवेत रुजू झाला असता‎

प्रतीकचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते. काही‎वर्षापासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.‎इंटेलिजन्स ब्युरोची त्याला आवड होती. स्पर्धा परीक्षेतून‎तो रेल्वेची परीक्षा पास झाला होता. आगामी आठ‎दिवसांत तो रेल्वेच्या सेवेत रुजू होणार होता. वडिलांवरही‎त्याने एकदा चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला होता, अशी‎माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

दरवाजे, खिडक्या बंद करत चढवला हल्ला‎

मी मनोरुग्ण नाही. तुम्ही मला जाणीवपूर्वक मनोरुग्ण‎ठरवत आहात, असे म्हणून प्रतीक आई-वडिलांशी वाद‎घालत होता. याच रागातून शनिवारी रात्री प्रतिकने घराचे‎दरवाजे, खिडक्या बंद करून आईवर बॅट आणि रॉडने‎हल्ला चढवला. या हल्ल्यात भारती चौथरे यांचा मृत्यू‎झाला. नंतर प्रतीकने घरातील दुसऱ्या खोलीत छताच्या‎हुकाला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या‎केली. भाग्यनगर पोलिसांत प्रतीकवर गुन्हा दाखल झाला.

घरी न जेवता बाहेरून‎मागवायचा खाद्यपदार्थ‎

याच घरामध्ये प्रतीकने आईवर हल्ला करुन स्वत:देखील गळफास घेत आत्महत्या केली.‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *