Headlines

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक




तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या बालकांसाठी गावातून पारंपरिक बैलगाडीने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी बैलगाडीला अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे नवागत बालकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. बैलगाडीचे धुरकरी भगवानसिंग गिरासे यांनी स्वतः बैलगाडी हाकत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *